पुण्यातील चार पोलिसांना मिळणार राष्ट्रपती पोलिस पदक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारतर्फे दिले जाणार्या पदकांसाठी पुणे शहर पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत.

उल्लेखनीय कार्यसाठी दिले जाणार राष्ट्रपती पोलिस पदक पोलिस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलिस निरीक्षक अशोक भोसले, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण थोरात व सहायक पोलिस निरीक्षक सुनील कुलकर्णी यांना जाहीर झाले आहे.

पवार हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एका महिलेचा खून करुन रेल्वेने पलुन जाणाऱ्या आरोपीना पकडताना पवार यांच्यावर गोळीबार झाला होता.

त्यामध्ये पवार यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. भोसले हे गुन्हे शाखेचे सहाययक पोलिस निरीक्षक म्हणून तर लक्ष्मण थोरात हे विशेष शाखेत सहाययक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर कुलकर्णी हे स्वारगेट पोलिस ठान्यात सहाययक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: President's Police Medal will be conferred to four police officers from pune 

संबंधित बातम्या

Saam TV Live