2014 ते 2021 पर्यंत सिलिंडरची किंमत दुप्पट , गेल्या वर्षापासून सिलिंडरची सबसिडीही बंद

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

गॅस सिलिंडरच्या दरवाढीनं सामान्य गॅसवर
2014 ते 2021 पर्यंत सिलिंडरची किंमत दुप्पट
गेल्या वर्षापासून सिलिंडरची सबसिडीही बंद

 

गॅस सिलिंडरही दिवसेंदिवस महागतोय. गेल्या सात वर्षांत घरगुती गॅसच्या सिलिंडरच्या किंमत दुप्पट झालीय. त्यामुळं घरात चूल पेटवावी की नाही असा प्रश्न निर्माण झालाय.

महागाईनं सामान्यांचं कंबरडं मोडलंय. जीवनावश्यक वस्तू महागल्यात. त्यात आता इंधन दरवाढीचं संकट थेट किचनपर्यंत पोहचलंय. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्यात.  2014मध्ये घरगुती वापराचा सिलिंडर 410 रुपयांना मिळत होता. डिसेंबर 2020मध्ये सिलिंडरची किंमत 600 रुपयांवर पोहचली. 2021मध्ये हाच सिलिंडर 819 रुपयांवर गेलाय. त्यात सिलिंडरवर मिळणारी सबसिडीही मे महिन्यापासून मिळालेली नाही. त्यामुळं किमान सबसिडी तरी द्या अशी विनवणी सामान्य करतायत.

 गॅस सिलिंडरच्या किंमतीत अशीच वाढ होत राहिली तर घरा गॅसची चूल पेटवावी की नाही असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live