PM MODI LIVE | ग्रामव्यवस्थेत महत्त्वाची भूमीका निभावणाऱ्या सरपंचांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट संवाद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

सध्या कोरोना राक्षस शहरांमध्ये पसरतोय, ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झालेले नाही...हेच पाहता काय काळजी घ्यावी याबाबतचा सल्ला मोदी आज देऊ शकतात. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते देशभरातल्या ग्रामपंचायतींना संबोधित कोलंय.

आज २४ एप्रील हा पंचायत राज दिवस म्हणून पाळला जातो. देशाच्या व्यवस्थेत महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामव्यवस्थेत महत्त्वाची भूमीका निभावणाऱ्या सरपंचांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी ११ वाजता व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. खुद्द मोदी यांनीच ही माहिती ट्वीटर वरुन दिली होती. 

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे. शहरी भागातल्या प्रशासनाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गावोगावचे सरपंच महत्त्वाची भूमीका निभावत आहेत. प्रसंगी हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. काही सरपंचांनी तर गेल्या महिनाभर आपल्या कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. अशा सर्वांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

पाह पंतप्रधानांचे सरपंचांना केलेलं हे संबोधन-