वाशी एपीएमसी मार्केटमध्ये २०० रूपयांत ओळखपत्र

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

कृषी उत्पन्न बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने ॲन्टीजेन चाचणी केल्यानंतर प्रवेश दिले जाणार आहे. त्याकरीता संबंधित व्यक्तीला ओळखपत्र देणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे

मुंबई : कृषी उत्पन्न बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने ॲन्टीजेन Antigen चाचणी केल्यानंतर प्रवेश दिले जाणार आहे. त्याकरीता संबंधित व्यक्तीला ओळखपत्र ID card देणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. मात्र बाजार समितीच्या ओळखपत्राला विरोध करून काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या खाजगी Private संघटनांच्या माध्यमातून चक्क २०० रूपयांत कामगारांना ओळखपत्र वाटप सुरू केले आहेत. ही बाब एपीएमसी APMC प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन कामगारांना केले आहे. Private Identity Cards Being issued in Vashi APMC

एपीएमसी मार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीच्या बातम्यांची दखल घेत. नवी मुंबई Navi Mumbai महापालिकेच्या पथकांनी मार्केटला भेट दिली होती. या भेटीत तोंडावर मास्क Mask नसणे, सॅनेटाईजरचा वापर नसणे आणि सुरक्षित अंतर न राखणे, आदी बाबी प्रकर्षाने दिसून आल्या होत्या. संचारबंदीचे Curfew उल्लंघन आणि कोव्हीड नियमांचे तंतोतंत पालन होत नसल्याने पालिकेतर्फे बाजार समिती प्रशासनाला कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्या धर्तीवर बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख यांनी १५ एप्रिलला ॲन्टीजेन चाचणी केल्यानंतरच संबंधित घटकांना बाजारात प्रवेश देणार असल्याचे निर्णय एका परिपत्रकाद्वारे कळवले होते.

बाजार घटक, व्यापारी, कामगार, मदतनीस यांचा ॲन्टीजेन चाचणीचा निगेटीव्ह आलेल्या अहवालाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या मुदतीवर प्रवेश देण्यासाठी बाजार समितीमार्फत ओळखपत्र दिले जाणार आहे. अशा घटकांची बाजार समितीमध्ये नोंद करून हे प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार बाजार समितीने ओळखपत्राचा मजकूरही प्रसिद्ध केला आहे. Private Identity Cards Being issued in Vashi APMC

मात्र काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करीत स्वतःच्या मालकीच्या संघटनांच्या नावाने ओळखपत्र देण्याचा धंदा सुरू केला आहे. भाजीपाला मार्केटमधील ए विंगमध्ये एका कथित संघटनेचे पदाधिकारी हातात केशरी रंगाचे पट्टे असलेले ओळखपत्र घेऊन टोळकीने २०० रूपयांची वसूली Recovery करत फिरतानाचे चित्रण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. कामगारांना बोलावून त्यांच्याकडून २०० रूपये घेऊन हातात ओळखपत्र दिली जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live