राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

मंगेश गाडे
गुरुवार, 10 जून 2021

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी येत्या काळात तालुक्यात महागाईच्या  विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 

नारायणगाव - जुन्नर Junnar तालुका राष्ट्रवादी NCP पक्षाच्या वतीने आज नारायणगाव Naryangaon येथे राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा वाढत्या महागाई विरोधात जाहीर निषेध व्यक्त करत, पेट्रोल Petrol व डिझेल  यांच्या सतत इंधनदरवाढ संदर्भात नारायणगाव येथील पुणे नाशिक हायवे वरील "शेवंताई" पेट्रोल पंपावर Petrol pump भाजप व मोदीसरकार Central Government विरोधात नारेबाजी केली.Proclamation against the Government on the anniversary of NCP

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी येत्या काळात तालुक्यात महागाईच्या  विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 

जितिन प्रसाद : काँग्रेसला सोडण्याची ३ कारणे आणि ब्राह्मण समीकरण?

आज दुपारी येथील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या शेवंताई पेट्रोल पंपाजवळ आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे,सूरज वाजगे, दिलीप कोल्हे,  अशोक घोडके, सुजाता शेवाळे, विकास दरेकर, भाऊ देवाडे, गणेश वाजगे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Proclamation against the Government on the anniversary of NCP

हे देखील पहा -

यावेळी आमदार बेनके म्हणाले की, डिझेल - पेट्रोल व खाद्य तेल आदींच्या भावात मोठी वाढ झाली आहे.खाद्य तेलाचे भाव दुप्पट झाले असून पेट्रोलने शंभरी पार केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे अर्थकारण कोसळले आहे. इंधन दरवाढ कमी न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी बेनके यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live