मेक इन इंडिया अंतर्गत सांगलीच्या उद्योजकानं उभारला प्रकल्प , कच्चे तेल काढण्यासाठी भारतीय यंत्र सामुग्री

साम टीव्ही
गुरुवार, 18 मार्च 2021

कच्चे तेल काढण्यासाठी भारतीय यंत्र सामुग्री
सांगलीच्या उद्योजकानं उभारला प्रकल्प
मेक इन इंडिया अंतर्गत यंत्राची निर्मिती 

 

 

 

 

समुद्रातून कच्च तेल काढण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री यापूर्वी भारताबाहेरून आयात करावी लागत होती. मात्र आता त्याची आवश्यकता नाहीय. कारण आता कच्च तेल काढण्यासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्रानेच पुढाकार घेतलाय. उद्योजक अशोक खाडे यांनी या प्रश्नावर तोडगा काढलाय. 

मेक इन इंडिया या संकल्पनेतून देशात साकारलेला हा मोठा प्रकल्प... दास कंपनीच्या माध्यमातून 200 एकरवर उभारण्यात आलाय. समुद्रातून कच्चं तेल काढण्यासाठी लागणारे दोन हजार टनाचे जॅकेट अवघ्या चार ते पाच महिन्यात उभारण्यात आलेत. हे जॅकेट आंध्रप्रदेशातील काकिनाडा येथील समुद्रात बसवण्यात येणार आहे.  ह्या जॅकेट ची वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या बोटीची निर्मिती याच ठिकाणी दास कंपनीने केलीय.. त्यामुळे भारताला आता कच्च तेल काढण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री आयात करण्याची गरज नाहीय.  

या प्रकल्पाने रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिलीय. या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाय

 सांगली जिल्ह्यातील पेड या छोट्याश्या गावात राहणारे अशोक खाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रकल्प देशातील मराठी उद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.तर राष्ट्रासाठी देखील एक महात्वाचं योगदान ठरणाराय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live