भंडाऱ्यातील प्राॅपर्टी डिलरच्या हत्येचे गुढ उकलले

अभिजित घोरमारे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

शहरातील प्रॉपर्टी डीलर समीर दास यांच्या 14 एप्रिलला झालेल्या हत्येचे गूढ भंडारा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उलगडले आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे

भंडारा : शहरातील प्रॉपर्टी डीलर समीर दास यांच्या 14 एप्रिलला झालेल्या हत्येचे गूढ भंडारा पोलीस Police स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उलगडले आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Property dealer murdered in land dispute

राहुल गोवर्धन भोंगाडे वय 26 रा. सुभाष वार्ड, श्रीकांत मदनलाल येरणे वय 31 वर्ष रा. तिरोडा  व आकाश रमेश महालगावे वय 23 वर्ष रा. अभ्यंकर वॉर्ड, सुभाष पुतळ्याजवळ यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

प्रॉपर्टी व्यवसायिक समीर दास Sameer Das ची हत्या केली असून, ही हत्या प्रापर्टीच्या वादातुन झाली असावी असे स्पष्ट झाले आहे. प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली ,असून 16 एप्रिल पर्यंत तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत. 

Edited By- Digambar jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live