उन्हाळ्यातील उष्णतेपासून देवाचे संरक्षण, विठुरायाला दररोज दीड किलो चंदनाचा लेप

भारत नागणे
बुधवार, 28 एप्रिल 2021

उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उखाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची  होणारी  घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते.   उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे ही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते.  

पंढरपूर - उन्हाळ्यातील Summer असह्य करणाऱ्या उखाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची  होणारी  घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो. तसाच देवांनाही God होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे ही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन Chandan उटी पूजा केली जाते.  To protect God from the heat of summer

ही परंपरा गेल्या अनेक शतकापासून मंदिरात Mandir सुरु आहे. सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा लेप विठ्ठल Vitthal आणि रुक्मिणीमातेच्या rukamni सर्वांगणाला लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रुप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रुप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक अतूर असतात.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे यावर्षीही भाविकांचा  चंदन उटी पूजा करण्याचा  लाभ चुकला आहे. दरवर्षी चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्या पासून चंदन उटी पूजेला सुरवात होते.  मृग नक्षत्रा पर्यंत नियमीत देवाला चंदनाचा लेप लावून चंदन उटी  पूजा केली जाते. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते. याच काळात मंदिर समितीला चांगले उत्पन्न ही मिळते,  पंरतु  कोरोनामुळे मंदिर व महापूजा बंद असल्याने मंदिर समितीला स्वखर्चातून ही पूजा करावी लागली. या काळात मंदिर समितीचे सुमारे 17 लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. To protect God from the heat of summer

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला थंडावा मिळावा  यासाठी  खास चंदन उटी पूजा केली जाते. चंदनाच्या लेपामुळे उष्ण काळात शरीर थंड राहते.  चंदन हे अतिशय सुगंधी , शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठुरायाला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो. चंदन उटीपूजे नंतर देवाला शिरा, पोहे, सुका मेवा कैरीच पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवद्य ही दाखवला जातो. 

चंदन उटी पूजेसाठी  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळुरू, म्हैसूर येथून उच्च प्रतीचे सुंगधी ४०० किलो चंदन खरेदी केले आहे . पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो .चंदन उटी पूजेमुळे  देवाचे रुप सुवर्णालंकार पेक्षाही उठून दिसते. म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात. कोरोनामुळे चंदन उटी पूजा करता येत नसल्याने भाविकांनाही याची हुरहूर लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live