लहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना

For the protection of children New guidelines of the Ministry of AYUSH
For the protection of children New guidelines of the Ministry of AYUSH

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना देखील अधिक धोका आल्याची शक्यता आहे. या विषाणूचा लहान मुलांवर देखील परिणाम होतो आहे. त्यामुळेच कोरोना काळात लहान मुलांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांमद्धे आयुर्वेदिक औषधे आणि नाट्रोस्यूटिकल्सद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, मास्क घालणे, योगा करणे, मोबाइलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि पालकांनी लसीकरण करणे या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे . त्यामुळेच लहान मुलांना कोरोना विषाणूची लागण होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगण्यात आले आहे. 

कोरोना विषानुला लढा देण्यासाठी आयुर्वेदिक उपचार प्रतिबंधात्मक औषध म्हणून गुणकारी मानले जात आहे. त्यात अधिक लठ्ठपणा, शुगर टाइप 1 क्रोनिक कॉर्डियोपल्मोनरी , तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांना या विषाणूचा अधिक धोका आहे. यामुळेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवने गरजेचे आहे. त्यामुळेच आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजे आहे. 

मुलांसाठी मारदर्शक सूचना - 

- लहान मुलांना सारखे हात स्वच्छ धुण्यास सांगणे . 

- घराबाहेर जातांना मास्क लावणे . 

- लहान मुले हात धुण्यास आणि मास्क लावण्यास नकार देत असेल तर त्यांना या मागील कारण प्रेमाने समजाऊन सांगणे. 

- 2 ते 5 या वयोगतील मुलांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच मास्क घातल्यानंतर पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. 

- 5 ते 18 या वयोगतील मुलांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. 

- तीन लेयर असलेल्या कापडी मास्क मुलांसाठी योग्य आहे. 

- गरज नसताना मुलांना बाहेर पठाऊ नये. 

- मुलांनामद्धे  कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास  त्यांना घातील वृद्ध व्यक्तिपासून दूर ठेवावे.  

मार्गदर्शक सुचणेप्रमाणे अशी घ्या मुलांची  काळजी 

- नियमितपणे कोमट पाणी प्यायला देणे 

-  दोन वर्षावरील मुलांनी दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि रात्री ब्रश करावे. 

-  पाच वर्षावरील मुलांची तेलाने मालीश करावी. 

- लहान मुलांकडून कोमट पाण्याने गूळन्या करून घ्यावीत. 

- लहान मुलांच्या नाकात 2 थेंब तेल टाकणे , प्राणायम करणे, ध्यान लावणे अशा प्रकारचे अभ्यास त्यांच्याकडून करून घ्यावेत. 

दरम्यान, लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकरीता त्यांना दररोज हळदीचं दूध, च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढे द्यावे. तसेच मुलांची पुरेशी झोप पूर्ण होणे गरजेचं आहे. त्यांना संतुलित असा योग्य आहार देणं देखील  गरजेचं आहे. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com