अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करत विरोधकांच्या घोषणा

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

 

  • अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन
  • विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
  • आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांवरुन आंदोलन
  • मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात विरोधकांची घोषणाबाजी

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचीही सुरवात विरोधकांच्या आंदोलनानं झालीय. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांसदर्भात विरोधक आक्रमक झाले. 

 विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. कोरोना हाय हाय, ठाकरे सरकार बाय बाय अशी घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी केली. त्याचबरोबर घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विधेयकांवर आक्षेप घेतले होते. तर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, यावेळी विधानसभेचं कामकाज सुरळीत चालतं का ते पाहणं महत्त्वाचं असेल.

पाहा सविस्तर व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live