कोरोनाबाबत चीनविरोधात ठोस पुरवे ,अमेरिकी हेरांनी भेदलं सर्वात मोठं रहस्य ?

साम टीव्ही
सोमवार, 4 मे 2020


'कोरोनाचा प्रसार चीनमधूनच, आमच्याकडे पुरावे आहेत'
अमेरिकेकडून पहिल्यांदाच पुराव्यांचा उल्लेख
अमेरिकी हेरांनी भेदलं सर्वात मोठं रहस्य ?
 

कोरोनाचा प्रसार चीनमधूनच झाला, यासंबंधी ठोस पुरावा असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. आजवर अमेरिकेकडून चीनवर अनेकदा आरोप झालेत पण पहिल्यांदाच अमेरिकेनं पुराव्यांचा उल्लेख केलाय.

कोरोना व्हायरस चीनमधूनच जगभरात पसरलाय आणि यासंबंधी ठोस पुरावे आपल्याकडे आहेत, असं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी चीनला आता थेट पुरावे सादर करण्याची धमकी दिलीय. वुहानमधील एका प्रयोगशाळेत कोरोना व्हायरस तयार झाला आणि जगभर पसरला असा आरोप अमेरिकेनं केलाय. त्यामुळे अमेरिकेची नजर वुहानमधल्या लॅबवर होतीच. त्यासंबंधी महत्त्वपूर्ण घबाड अमेरिकेच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

कोरोना व्हायरस मानवनिर्मित आहे आणि तो वुहानच्याच प्रयोगशाळेतून पसरलाय, यासंबंधी ठोस पुरावे असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. फण चीननं अमेरिकेचे आरोप नेहमीप्रमाणे फेटाळलेत. चीननं हा व्हायरस तयार केला आणि साऱ्या जगभर पसरवला असा आरोप जगातील अनेक देशांनी केलाय. महासत्ता होण्यासाठी चीन जर ही पातळी गाठत असेल तर चीनसोबत आर्थिक संबंध ठेवायचे की नाही, याचा विचार आता अनेक देशात सुरु झालाय. पुरावे सादर करु शकतो, या अमेरिकेच्या दाव्यामुळे तर आता चीनवर जागतिक आर्थिक बहिष्कार घालण्याच्या दृष्टीनं पावलंही उचलली जातायंत.


संबंधित बातम्या

Saam TV Live