मिरजेत राज्य सरकार व केंद्र सरकारचा जाहीर निषेध

Public protest of Maratha Kranti Morcha state government and central government in Sangli Miraj
Public protest of Maratha Kranti Morcha state government and central government in Sangli Miraj

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिल्यानंतर याचे पडसाद सांगलीच्या Sangali मिरजेत Miraj उमटले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू  परखड पणे मांडली नाही. सर्वोच्च न्यायालयाने  मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा, अखिल भारतीय  मराठा महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज मार्केट परिसरात एकत्र येऊन  केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा  निषेध व्यक्त केला आहे. Public protest Maratha Kranti Morcha 

१०२ व्या घटना दुरुस्तीमुळे Constitution Amendment आरक्षण देण्याच्या राज्य सरकारांच्या अधिकारांना धक्का बसलेला नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. त्यावेळी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले होते की, घटनेतील ३४२ (अ) या कलमातील व १०२ व्या दुरुस्तीनुसार एसईबीसी SEBC यादी तयार करून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारांच्या अधिकारांना धक्का बसत नाही. 

हे देखील पहा -

यापूर्वीच्या सुनावणीत वेणुगोपाल यांनी एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारांना नाहीत, अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीने मांडली होती. त्यामुळे मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयही शिक्कामोर्तब करेल, अशी अपेक्षा मराठा समाजाला होती. नऊ सदस्यीय पीठाने इंदिरा साहना प्रकरणात दिलेल्या निवाड्याचा फेरविचार करण्याची गरज नाही. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासारखी आणिबाणीची परिस्थिती नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. Public protest Maratha Kranti Morcha 

मराठा समाजाबाबत गायकवाड समितीने दिलेला अहवाल असमर्थनीय असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. आज कोणत्याही पक्षाने मराठा समाजाला न्याय मिळवून दिला नसल्याने मराठा समाज आता स्वतंत्र पक्ष लवकरच स्थापन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विलास देसाई यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com