शेतकऱ्यांचा पाकिस्तानला दणका; आता टोमॅटो 180 रुपये किलो!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही कडाडले आहेत. 

नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही कडाडले आहेत. 

पुलवामा हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान हुतात्मा झाले. यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर म्हणून भारताने अद्याप युद्ध हा पर्याय स्वीकारला नसला, तरीही आर्थिक आणि राजकीय कोंडी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आणि आयात-निर्यात शुल्कही वाढविले. 

त्याचवेळी, देशातील व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानला करणारी निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते मार्गाने होणारी मालवाहतूक बहुतांशी ठप्प झाली आहे. मध्य प्रदेशमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

आझादपूर येथील भाजी मंडईतून पाकिस्तानला सर्वाधिक नाशवंत माल पुरवठा केला जातो. अटारी-वाघा या मार्गे रोज किमान 75 ते 100 ट्रक टोमॅटो पाकिस्तानला निर्यात केला जात असे. पुलवामा हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली आहे. टोमॅटोशिवाय इतर भाज्या, कापूस इत्यादींच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. 2017 मध्येही भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळीही निर्यात बंद केल्यानंतर लाहोर आणि पंजाब प्रांतात काही ठिकाणी टोमॅटोचे भाव 300 रुपये प्रतिकिलो एवढे झाले होते. 

लाहोरमधील भाजी मंडईत याचा थेट परिणाम दिसत आहे. येथे टोमॅटो 180 रुपये किलो या भावाने विकला जात आहे. कांदा आणि बटाट्याचा भावही जवळपास दुप्पट झाला आहे. ढोबळी मिर्ची 80 रुपये किलो, तर भेंडी 120 रुपये किलो या दराने विकली जात आहे. 

पाकिस्तानला केली जाणारी निर्यात बंद केल्यामुळे आखाती देशांसह इतर बाजारपेठांचा पर्याय खुला करण्याची मागणी काही शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

Web Title: Pulwama Terror Attack affects export, Tomatoes in Lahore sell at Rs 180 per kg


संबंधित बातम्या

Saam TV Live