उद्धवजी ठाकरे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे : गणेश बिडकर

अमोल कविटकर
गुरुवार, 13 मे 2021

कोरोना विरोधातील लढ्यात गेल्या १४ महिन्यापासून राज्य सरकारने पुण्याला वाऱ्यावर सोडले आहे. शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुणे महापालिकेने थेट कंपनीकडून लस खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र राज्य सरकार त्यावर ठोस निर्णय घेत नाही असा आरोप गणेश बीडकर यांनी केला आहे

पुणे : कोरोना Corona विरोधातील लढ्यात गेल्या १४ महिन्यापासून राज्य सरकारने पुण्याला Pune वाऱ्यावर सोडले आहे. शहरातील नागरिकांचे लसीकरण Corona Vaccination  करण्यासाठी पुणे महापालिकेने  PMC थेट कंपनीकडून लस खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र राज्य सरकार त्यावर ठोस निर्णय घेत नाही. दुसऱ्या बाजूला मुंबई पालिकेला थेट लस खरेदी करण्याची परवानगी दिली जाते. राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचा आरोप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केला. शिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र Maharashtra नाही, असाही टोला बिडकर यांनी हाणला आहे.Pune BJP leader Ganesh Bidkar Challenged Uddhav Thackeray

हे देखिल पहा - 

बिडकर पुढे म्हणाले, 'कोरोना विरोधातील लढ्यात गेल्या १४ महिन्यांपासून महापालिका काम करत आहे. राज्य सरकारने एकही रुपयांची मदत न करता केवळ पालिकेच्या विनंती पत्रांना केराची टोपली दाखविण्याचे काम केले आहे.  थेट लस खरेदी करण्याची मागणी करणारे पत्र पालिकेने २० एप्रिलला राज्य सरकारकडे पाठवले. यासाठी आवश्यक असलेला निधी स्थायी समितीने मंजूर केला. पुणेकर नागरिकांचे वेगाने आणि सुरक्षित लसीकरण व्हावे, यासाठी पालिका आग्रही असताना राज्य सरकार अन्याय करत आहेत'.

लातूरमध्ये कोविड हाॅस्पीटलची मान्यता रद्द

'लस खरेदीची तयारी महापालिकेने दाखविलेली असतांनाही राज्य पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेसाठी एक कोटी लसी खरेदी करण्याला परवानगी दिली जाते, हे अत्यंत संतापजनक आहे. मुख्यमंत्री केवळ मुंबईचे आहेत की राज्याचे? असा प्रश्नही सभागृह नेते बिडकर यांनी विचारला आहे. मुंबईतील नागरिकांचे लसीकरण झालेच पाहीजे, याला आमचा विरोध नाही. पण तोच न्याय महाराष्ट्रातील अन्य जनतेसाठीही असला पाहीजे, पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे लस खरेदीची मागणी करतात आणि दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी लस खरेदीच्या निविदा निघतात, मग पुणे पालिकेच्या बाबतीत हा दुजाभाव का? असा सवालही बिडकर यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live