पुणे शहर काँग्रेसला बळ, उद्योजक गणेश गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश

सागर आव्हाड
रविवार, 25 एप्रिल 2021

औंध येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. 

पुणे : प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यातही काँग्रेस प्रवेश सुरु झालेत. औंध येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. Pune Businessman Ganesh Gaikwad Enters congress in front of Nana Patole

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि नानासाहेब गायकवाड यावेळी उपस्थित होते.  प्रदेश युवक काँग्रेसमध्ये गणेश गायकवाड यांना लवकरच मोठो जबाबदारी दिली जाणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. गायकवाड यांच्या प्रवेशाने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी - चिंचवड मध्ये काँग्रेसला मोठे बळ मिळेल. तसेच, तरुणांमधील गायकवाड यांच्या संपर्काचा काँगेसच्या वाढीसाठी उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलेय. 

बांधकाम आणि उद्योग क्षेत्रातील गायकवाड यांच्या प्रतिमेचा देखील या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस पक्षाला उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलंय.  चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. Pune Businessman Ganesh Gaikwad Enters congress in front of Nana Patole

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील होते. त्यामुळे गायकवाड यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस ही गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीलाही धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live