यंदा ‘दगडूशेठ’ साकारणार श्री गणेश सूर्यमंदिराची प्रतिकृती

यंदा ‘दगडूशेठ’ साकारणार श्री गणेश सूर्यमंदिराची प्रतिकृती

गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदा ओडिशा येथील श्री गणेश सूर्यमंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. हे मंदिर जगप्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित असल्याने मंदिराची प्रतिकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मोतिया रंगाच्या लाखो दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार असून, हा नयनरम्य देखावा पारणे फेडणारा असेल. 

'मंदिरामध्ये, तसेच रस्त्याच्या दुतर्फा मारणे इलेक्ट्रिकल्सतर्फे २२५ झुंबर लावण्यात येणार आहेत. मंदिराचे कलादिग्दर्शन शिल्पकार विवेक खटावकर यांचे आहे. विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, तसेच मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे. शिखरांमध्ये हे सूर्यमंदिर आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन, तसेच वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर नागरिकांना पाहता येईल. स्तंभ, मालांची तोरणे, सिंह, कीर्तीमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी यांच्या प्रतिमांनी मंदिर सजविले जाणार आहे,' असे गोडसे यांनी सांगितले. २ तारखेला प्रतिष्ठापना होणार असून, ३ सप्टेंबरला पहाटे सहा वाजता २५ हजार महिला सामूहिक अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. 

'ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिराच्या प्रतिकृतीचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन २ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे,' अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.  

गणेशोत्सवात सुरक्षेसाठी १५० कॅमेरे, पोलिस यंत्रणा आणि दोनशे खासगी सुरक्षारक्षक अशी व्यवस्था असेल. पुणे, पिंपरी-चिंचवड व कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. याशिवाय कायमस्वरूपी उभारलेल्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. 

Web Title pune dagdusheth ganpati decorate shri ganesh surya mandir

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com