कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक लाखाचा दणका! पुणे मनपाची कारवाई

सागर आव्हाड
मंगळवार, 25 मे 2021

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र.१७, १८ व १९ मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे

पुणे : कोरोना Corona महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध Restrictions  जारी केले आहेत. भवानी पेठ Bhavani Peth क्षेत्रीय कार्यालयाच्या Regional Office वतीने प्रभाग क्र.१७, १८ व १९ मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई Action करण्यात आली आहे.Pune Municipal Corporation Collects One Lakh Fine From Violators Of Guidelines!

निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नाना पेठ परिसरातील मिलन Milan हॉटेलवर Hotel महापालिकेकडून Muncipal Corporation कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल ला पार्सल देण्याची परवानगी आहे. मात्र हॉटेल मध्ये लोकांची गर्दी दिसून आली. तसेच कोणतेही नियम याठिकाणी पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळात सर्व हॉटेल बंद असताना देखील हॉटेल चालू ठेवून नियमांचे उल्लंघन या हॉटेलद्वारे केले गेले. 

हे देखील पहा -

त्यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे न पाळणे आदी बाबीतील दंडात्मक कारवाई करून एक लाख रुपये दंड या हॉटेल कडून वसूल करण्यात आला आहे. Pune Municipal Corporation Collects One Lakh Fine From Violators Of Guidelines!

वादळ गेल्यावर किसान अ‍ॅप अलर्ट !

महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या आदेशानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुक्तार सय्यद, आरोग्य निरीक्षक संतोष कदम, संजय साळुंके, निलेश चव्हाण, निसार मुजावर, मोहन चंदेले, मोकादम सुमित चिंतल, राजू पेटाडे, प्रदिप परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

प्रभाग क्र. १७,१८,१९ येथे  व्यावसायिक व नागरिक यांच्यावर मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, कोविड संदर्भातील  मार्गदर्शक तत्वे न पाळणे इ. बाबतील दंडात्मक कारवाईमध्ये सोशल डिस्टन्सिंग संदर्भात गुन्हा दाखल करून एक लाख रुपयांचा दंड आकारला, तर विनामास्कच्या १४ जणांवर कारवाई करून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live