पुण्यात पुन्हा कोरोनाचा प्रदुर्भाव वाढला, आठवड्यात 10 हजार रुग्ण

साम टीव्ही
बुधवार, 10 मार्च 2021

पुणे पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

पुणेत पुन्हा आठवड्यात वाढले 10 हजार कोरोना रुग्ण

शून्य रुग्णसंख्येकडून पुणे कोरोना हॉटस्पॉटकडे

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून हजाराच्या पटीत कोरोनाचे रुग्ण वाढतायत. त्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

पुणे पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय की काय अशी स्थिती आहे. डिसेंबर जानेवारीत पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड कमी झाली होती. पण अनलॉकिंगनंतर पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढलीय.  3 मार्चला पुण्यात 1 हजार 714 नवे कोरोना रुग्ण होते. 4 मार्चला 1 हजार 831 रुग्ण, 5 मार्चला 1 हजार 803, त्यानंतर 6 मार्चला 1 हजार 944 रुग्ण 7 मार्चला 2 हजार 44 आणि 8 मार्चला 1 हजार 412 रुग्ण आढळलेत.  वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिका अंशःत लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. पुणेकरांनी कोरोना नियम पाळल्यास पुणे लॉकडाऊन होणार नाही. पण यासाठी पुणेकरांना तोंडावरचा मास्क कायम ठेवावा लागणार आहे.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live