खासगी लॅब मधून कोरोना रिपोर्ट काढताय ? तर तो पुन्हा पुन्हा तपासा (पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

पुण्यात बोगस रिपोर्ट काढणाऱ्या एका लॅबचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीने दिलेल्या बोगस रिपोर्ट मुळे आणखीन कोरोनाचा फैलाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतर्क पुणेकरांमुळे सध्या ही जोडगोळी गजाआड आहे. 

पुणे : तुम्ही खाजगी लॅबच्या माणसाकडून कोरोना रिपोर्ट काढला असेल तर तो पुन्हा पुन्हा तपासा! कारण पुण्यात Pune कोरोनाचे बोगस रिपोर्ट Fake Reports देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी Police पर्दाफाश केला आहे. Police busted gang that made fake corona reports in Pune

टोळीने दिलेल्या बोगस रिपोर्ट मुळे आणखीन कोरोनाचा Corona फैलाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतर्क पुणेकरांमुळे जोडगोळी गजाआड आहे. हे आरोपी एका खाजगी लॅबच्या नावाखाली मनाला येईल वाट्टेल तसे रिपोर्ट देत होते. निगेटिव्ह रिपोर्ट येऊनही कोरोनाची Corona लक्षणे वाढलेल्या रुग्णाने चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.  

याबाबत अधिक माहिती सांगितली आहे वरिष्ठ पोलीस Police निरीक्षक मुरलीधर करपे यांनी. त्यांनी सांगितले की, डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक लॅब आहे. या लॅब च्या नावाने बनावट आर्टिफिशिअल कोविड चाचणी तपासणीचे रिपोर्ट बनवल्याची  तक्रार मिळाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला. दोन आरोपींना शनिवारी (ता. १७) ताब्यात घेतलेले आहे. Police busted gang that made fake corona reports in Pune

बोगस रिपोर्ट कसा पाठवत होते:

मोबाईलवर जो रिपोर्ट असतो तो एडिट करायचा, आणि कोणत्याही लॅबचा RTPCR रिपोर्ट जो फॉरमॅट असतो त्याच फॉरमॅटमध्ये तो एडिट करायचा. त्यात त्या रुग्णाचे नाव टाकायचे आणि तो रिपोर्ट त्यांना मोबाईलद्वारे पाठवून द्यायचा. अशाप्रकारे या टोळीने बनावट रिपोर्ट दिले आहेत.

गेल्या एक महिन्यापासून ही जोडगोळी बोगस रिपोर्ट देत आहे. या दोघांमुळे कित्येक कोरोना रुग्णांनी बिनधास्त फिरून कोरोनाचा फैलाव  केला याची कल्पना न केलेलीच बरी !

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live