पुणे रेल्वे स्थानक स्वच्छ भारत सर्वेक्षणात चौथे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पुणे रेल्वे स्थानक स्वच्छ भारत सर्वेक्षणात चौथे 

पुणे - रेल्वे मंत्रालयाने "स्वच्छ भारत'अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात सूरत स्थानकाने प्रथम, दादर स्थानकाने दुसरा, तर सिकंदराबाद स्थानकाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

पर्यावरण आणि हाउसकीपिंग (स्वच्छतागृह आणि स्थानकांवरील स्वच्छता) या प्रमुख बाबींवर हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये स्थानकाच्या आवारातील स्वच्छता आणि चांगले पर्यावरणपूरक स्थानक यावर भर दिला होता. 

भारतीय गुणवत्ता परिषदेने देशातील 720 रेल्वे स्थानकांवर हे सर्वेक्षण केले. ज्या स्थानकांचे उत्पन्न 500 कोटींपेक्षा जास्त आणि दोन कोटींपेक्षा अधिक प्रवासी वर्षभर प्रवास करतात, अशा "नॉन सबअर्बन' (एनएसजी 1) प्रवर्गातील स्थानकांचा समावेश होता. यामध्ये मध्य रेल्वेच्या 21 स्थानकांचा समावेश आहे. या सर्वेक्षणातील अन्य प्रकारामध्येही मध्य रेल्वेने बाजी मारली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे रेल्वे स्थानकाच्या यशाबद्दल मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

स्थानक व परिसराच्या स्वच्छतेवर प्रमुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येते. तसेच, प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 
मिलिंद देऊस्कर, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे 
 
Web Title: Pune Railway Station is fourth in the Clean India Survey

संबंधित बातम्या

Saam TV Live