पुण्यात पुन्हा पाणीच पाणी  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

 

रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांइतके पाणी वाहते, लाखो पुणेकरांचा जीव टांगणीला लागतो, झाडे पडून लोकांचा जीव जातोय, पुण्यात हे सारे घडतेय ते जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात! एवढे घडूनही महापालिकेकडे मात्र एकाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. किती ठिकाणी पाणी साचले आहे? या प्रश्‍नावर केवळ तीन रस्त्यांवर पाणी असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत होते. तेव्हाच बहुतांशी भागांतील रस्ते पाण्याने व्यापल्याचे चित्र होते.

 

रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांइतके पाणी वाहते, लाखो पुणेकरांचा जीव टांगणीला लागतो, झाडे पडून लोकांचा जीव जातोय, पुण्यात हे सारे घडतेय ते जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात! एवढे घडूनही महापालिकेकडे मात्र एकाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. किती ठिकाणी पाणी साचले आहे? या प्रश्‍नावर केवळ तीन रस्त्यांवर पाणी असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत होते. तेव्हाच बहुतांशी भागांतील रस्ते पाण्याने व्यापल्याचे चित्र होते.

कोथरूड - जोरदार पावसामुळे बुधवारी सायंकाळी कर्वे रस्त्यावर साचलेले पाणीच पाणी.
पुणे - रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांइतके पाणी वाहते, लाखो पुणेकरांचा जीव टांगणीला लागतो, झाडे पडून लोकांचा जीव जातोय, पुण्यात हे सारे घडतेय ते जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात! एवढे घडूनही महापालिकेकडे मात्र एकाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. किती ठिकाणी पाणी साचले आहे? या प्रश्‍नावर केवळ तीन रस्त्यांवर पाणी असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत होते. तेव्हाच बहुतांशी भागांतील रस्ते पाण्याने व्यापल्याचे चित्र होते.

यंदाच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही तिसरी वेळ. यापूर्वी, २५ सप्टेंबर व चार ऑक्‍टोबर या दिवशी पुणे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. आजच्या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, सिंहगड, सातारा, कर्वे रस्त्यासह प्रमुख रस्ते या भागात प्रवास करणाऱ्या आणि राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले. 

पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पावसाळी गटारांची व्यवस्था आहे. पावसाळ्याआधी या गटारांसह ओढ्या- नाल्यांची  साफसफाई केल्याचा महापालिकेने यंदाही दावा केला. त्यामुळे पावसात रस्त्यांवरचे पाणी वेगाने वाहून जाईल आणि ते कुठेही तुंबणार नाही, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अगदी किरकोळ पाऊस झाला तरी बहुतांशी रस्ते जलमय होऊन ते जीवघेणे ठरत असल्याचे आता वारंवार दिसून येत आहे. पाणी वाहून जाण्यासाठी असलेली यंत्रणा तोकडी आणि निकृष्ट असल्याचे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने अधोरेखित केले. या पावसाने रस्त्यांवर प्रचंड पाणी येऊन शेकडो वाहने वाहून गेली, तर काही जणांना जीव गमवावा लागला. या घटनांमुळे महापालिकेला जाग येऊन उपाययोजना करण्याची आशा बुधवारी खोटी ठरली. कर्वे रस्ता, प्रभात रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यांवरील पाण्यात वाहने वाहून जाण्याइतपत भीषण स्थिती होती, तर सहकारनगरमध्ये पाण्यात गेलेली वाहने काढताना लोकांना जीव धोक्‍यात घालावा लागला. 

शहराच्या बहुतांशी भागांतील रस्त्यांवर पाणी येऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली तरी महापालिकेच्या दप्तरी मात्र तीनच रस्त्यांवर पाणी आल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे ते पाणीही काही मिनिटांत ओसरल्याचे अधिकारी सांगत होते. 

शहरातील प्रमुख तीन-चार रस्त्यांवर पाणी साचले होते. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शिवाय, ज्या भागांत पाणी शिरण्याचा धोका आहे, त्या भागांत कर्मचारी पाठविले आहेत.
- गणेश सोनुणे, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका

Web Title: Pune Rains water on road
 


संबंधित बातम्या

Saam TV Live