चोरट्या दाजी आणि मेहुण्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जनार्दन दांडगे
शनिवार, 10 एप्रिल 2021

जिल्ह्य़ाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दाजी व  मेहुण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ग्रामीण ) पोलिसांनी सासवड परिसरातून गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे.

लोणी काळभोर (पुणे ) - जिल्ह्य़ाच्या Pune District विविध पोलीस ठाण्याच्या Police Station हद्दीत 19 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दाजी व  मेहुण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ग्रामीण ) पोलिसांनी सासवड Saswad परिसरातून गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीत आरोपीची बहीण हीच सहकार्य करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Pune Rural Police arrested two for Thefts in District

अजय राजू अवचिते (वय- २७ ) गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय- २७ ) रा. दोघेही आलेगाव पागा, ता. शिरूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, आरोपींच्या कडुन सोने- चांदीच्या दागिन्यांसह Ornaments साडेपाच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवरी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील सोपान मारुती भिसे (वय- ५० ) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून साडे चौदा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेलेला होता. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेअंर्तगत Crime Branch करण्याच्या सूचना पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख Abhinav Deshmukh यांनी दिल्या. 

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक API सचिन काळे, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर काशिनाथ राजापुरे, यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास घटनास्थळी जाऊन सुरू केला. Pune Rural Police arrested two for Thefts in District

अखेर दीड वर्षांनंतर महाबीजला मिळाले एमडी

त्यावेळी तेथील सीसीटीव्ही CCTV फुटेजद्वारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी अजय अवचिते याने केला असल्याची खात्रीपूर्वक माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपी अजय अवचिते  हा राहत असलेल्या ढवळगाव (ता. अहमदनगर), आलेगाव पागा, (ता. शिरूर ), बारामती, पुरंदर, सासवड, लोहियानागर, पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क, या ठिकाणी जाऊन शोध घेतला परंतु मिळून आला नाही. 

दरम्यान, आरोपी अजय अवचिते व त्याचा साथीदार सासवड (ता. पुरंदर) Purandar या ठिकाणी येणार असल्याची खात्रीदायक माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून व वेषांतर करून अजय अवचितेव त्याचा जोडीदार गणेश उर्फ ठोम्या भोसले यांना ताब्यात घेण्यात आले.

अयोध्येचा कायापालट - युनेस्कोच्या यादीत समावेशाचे प्रयत्न

सदर आरोपींकडे चौकशी केली असता अजय अवचिते याचा साथीदार हा  मेव्हूना गणेश उर्फ ठोम्या भोसले आहे असे समजले.  अजय अवचिते,  मेव्हूना गणेश भोसले, पत्नी सीमा अवचिते असे तिघे मिळून घरफोड्या, चोऱ्या Thefts करण्यासाठी जात असत. सीमा फक्त कोणी येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायचे काम करीत असे. आतापर्यंत या तिघांनी मिळून दौंड, कोडीत, भिवरी, सासवड, जयदीप कार्यालयाजवळील म्हाडा कॉलनी, कोंडवाडा, किरकटवाडी, भिगवन, बोरिपारधी,  नगर रोड एल अँड टी फाटा, गॅस गोडाऊन च्या जवळ  या ठिकाणी बंद घराचे कुलूप कडीकोयंडा तोडून चोरी  केल्याचे तसेच बजरंग वाडी येथे चोरी करण्यासाठी कुलूप तोडले परंतु लोक जागे झाले म्हणून पळून गेले बाबत सांगितले आहे. Pune Rural Police arrested two for Thefts in District

दरम्यान, सदर आरोपींकडून घरफोडी House Breaking व चोरीचे ११ पुणे उघडकीस आणून त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने, व एक गॅस सिलेंडर असा एकूण ५ लाख ३७ हजार, सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.  दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून यांच्यावर हडपसर, लोणी काळभोर, जेजुरी, बारामती शहर,  बारामती तालुका,  सासवड, भिगवण, खेड, शिरूर, या पोलीस स्टेशनला खुणांसह दरोडा जबरी चोरी, घरफोडी, असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live