जुन्नर व दौंडमध्ये रेमडिसिव्हरचा काळाबाजार करणारे तरुण गजाआड

Pune Rural police Arrested three for selling remdesivir injections
Pune Rural police Arrested three for selling remdesivir injections

जुन्नर : पुणे ग्रामीण पोलीसांच्या Pune Rural Police स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत  जुन्नरमधुन एका तरुणाला तर दौंडमधुन दोघांना अटक केली असुन त्याच्याकडुन 3 तीन रेमडिसिव्हर इंजेक्शनसह मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. Pune Rural Police Arrested Youth for Selling Remedisivir in Black Market

कोरोना Corona महामारीच्या संकट काळात पुण्याच्या ग्रामीण व डोंगराळ आदिवासी भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत असल्याने रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन Oxygen व रेमडिसिव्हर Remdisivir इंजेक्शनची गरज निर्माण होत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी  व दौंड येथे रेमडिसिव्हर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत होता यावेळी पुणे Pune ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत  जुन्नरमधुन Junnar एका तरुणाला तर दौंडमधुन दोघांना अटक केली असुन त्याच्याकडुन 3 तीन रेमडिसिव्हर इंजेक्शनसह मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापळा रचुन दौडमधुन अक्षय सोनवने व सुरज साबळे या दोघांना तीन इंजेक्शनसह तर जुन्नरमधुन रोहन गणेशकर याला तीन इंजेक्शनसह अटक केली आहे.  कारवाई पोलीस निरिक्षक पदमाकर घनवट,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. Pune Rural Police Arrested Youth for Selling Remedisivir in Black Market

रेमडिसिव्हर इंजेक्शन राज्य सरकारने Maharashtra Government  अत्यावशक वस्तुंमध्ये समावेश केला आहे त्यामुळे या इंजेक्शनचे वितरण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडुन थेट रुग्नालयांना केले जात आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शन बाहेर बाजारात उपलब्ध होत नाही.  रुग्णांच्या गरजेमुळे नातेवाईक पाहिजे त्या किमतीला इंजेक्शन विकत घेण्याची तयारी दाखवितात याचाच फायदा घेत काही समाजघटकांकडुन इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. यामुळे रुग्णांना धोका निर्माण होण्याची चिन्ह असतात, तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरील बाजारात रेमडिसिव्हर इंजेक्शन खरेदी करु नये असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख Abhinav Deshmukh यांनी केले आहे..

कोरोना महामारीच्या संकटात रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक कोरोना रुग्णांवर तात्काळ योग्य उपचार व्हावे यासाठी अनेकांपुढे हात जोडुन रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी करत आहेत. मात्र याच मजबुरीचा फायदा घेत काही समाजकंठक इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. पुढील काळात रेमडिसिव्हरचा काळाबाजार रोखण्याचे मोठे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांसमोर असणार आहे.

Edited by - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com