बिभत्स नृत्य करताना १३ जण ताब्यात; राजगड पोलिसांची कारवाई

सागर आव्हाड
रविवार, 30 मे 2021

सातारा Satara महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीत दुमजली फार्म हाऊसवरील Farm House बंगल्यामध्ये पैशाची उधळण करत मुलामुलींचा डान्स Dance Party सुरू होता. यावेळी राजगड पोलीसांच्या Police छाप्यात १३ जणांना ताब्यात घेतले

पुणे : सातारा Satara महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीत दुमजली फार्म हाऊसवरील Farm House बंगल्यामध्ये पैशाची उधळण करत मुलामुलींचा डान्स Dance Party सुरू होता. यावेळी राजगड पोलीसांच्या Police छाप्यात १३ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. Pune Rural Police Raided Dance Party at Rajgadh 

राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळावडे येथील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांच्या मालकीच्या केळवडे येथे असलेल्या दुमजली बंगल्यामध्ये रंगीबेरंगी लाईटचा उजेड करून व मोठ्या आवाजाचा साऊंड लावून मुलं आणि मुली नृत्य करीत होत्या. या फार्म हाऊसवर डान्स चालू असून पैशाची उधळण सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तातडीने कळविली. 

मेहुल चोक्सीचं तुरुंगातील छायाचित्र झालं प्रसिद्ध

त्यानंतर शनिवारी  दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा टाकला.  मुलांसह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ५ आणि ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केला म्हणून त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Rural Police Raided Dance Party at Rajgadh 

उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्यासह उपनिरिक्षक  श्रीकांत जोशी, हवालदार एस. एन. कार्लेकर, गायकवाड, श्रीमती एस. आर. कुतवळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरिक्षक  श्रीकांत जोशी करत आहेत.

हे देखिल पहा