कोरोनाच्या भीतीने पुण्यात 3 दिवस शाळा बंद

साम टीव्ही
बुधवार, 11 मार्च 2020
  • कोरोनाच्या भीतीने पुण्यात 3 दिवस शाळा बंद
  • SNBP इंटरनॅशनल स्कूल 14 मार्चपर्यंत बंद
  • कात्रज, सिंहगड परिसरातील शाळा बंद
  • काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

पुणे: पुण्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाचवर गेलीय. या सर्व कोरोनाग्रस्तांवर पुणे पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतलाय़. कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय.

हे ही वाचा - धक्कादायक! मुंबई आणि पुण्यात कोरोनाची एन्ट्री, रुग्णांची संख्या 5 वर

हे ही वाचा - करोनाची मुंबईत दहशत, कस्तुरबा रूग्णालयात 6 रूग्ण दाखल 

हे ही वाचा - काळजी करू नका , कोरोनो म्हणजे काय हे जाणून घ्या 

 

 

Webtitle: Pune School Closed for 3 days due to Corona Virus


संबंधित बातम्या

Saam TV Live