पुन्हा  सिंगापूरसाठी विमानसेवा सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे - पुणे-सिंगापूर प्रवासी विमानसेवा सात महिन्यांच्या खंडानंतर नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. देशातील अग्रगण्य विमान वाहतूक कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली.

कर्जबाजारी झाल्यामुळे जेट एअरवेजने १७ एप्रिलपासून देशातील अन्य मार्गांसह सिंगापूर मार्गावरील विमान वाहतूक बंद केली होती. सिंगापूर मार्गावरील विमानसेवा सुरवातीला दक्षिणपूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियाला जोडली गेली. गेल्या वर्षी एक डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरू झाली होती. 

पुणे आणि परिसरातील जिल्ह्यांतून सिंगापूर मार्गावरील विमान वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पर्यटक, व्यापारी, उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते, विद्यार्थी आदींचा त्यात समावेश होता. या मार्गावरील विमान वाहतुकीचे वेळापत्रक लवकरच निश्‍चित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pune-Singapore Airlines starts
 
संबंधित बातम्या

Saam TV Live