पुण्यात एका गतीमंद तरुणीला दुसऱ्या तरुणीनं दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकल

साम टीव्ही
सोमवार, 1 मार्च 2021

पुण्यात एका गतीमंद तरुणीला दुसऱ्या तरुणीनं दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलंय. कोथरुडच्या सावली गतीमंद आणि बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत ही घटना घडलीय.  

पुण्यात एका गतीमंद तरुणीला दुसऱ्या तरुणीनं दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलंय. कोथरुडच्या सावली गतीमंद आणि बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत ही घटना घडलीय. यात ममता डोंगरे या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय.

ममताला तिच्यासोबतच उपचार घेणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीनं फेकलंय. ममताला दुसऱ्या माळ्यावरुन फेकतानाचे सीसीटीव्ही हाती लागलेत. शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. संस्थेच्या दुसऱ्या माळ्यावरुन ममता चालत निघाली होती. यावेळी अचानक तिच्या मागून आलेल्या १४ वर्षांच्या गतीमंद मुलीनं तिला फेकून दिलं. यात ममताचा जागीच मृत्यू झालाय.

एका  मुलींच्या संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून उचलून खाली फेकल्या मुळे एका 33 वर्षीय मतीमंद मुलीचा मृत्यू झालाय. डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.ममता मोहन डोंगरे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी संस्थेतील एका 14 वर्षीय मतिमंद मुलीवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अनिता रामकिसन टापरे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन्ही मतिमंद मुली या सावली मतिमंद बहुविकलांग प्रतिष्ठान येथे राहतात.

शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत ममता डोंगरे ही संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवरून चालत असताना संस्थेतच राहणारी 14 वर्षीय मतिमंद मुलगी त्या ठीकाणी आली. तिने ममता डोंगरे हिला पाठीमागून पकडले आणि उचलून दुसऱ्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे आमचा डोंगरेचा मृत्यू झालाय. कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live