पुरंदर विमानतळ लवकरच होणार सुरु 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत.

पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत.

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्यंतरी या प्राधिकरणाचे विस्तारीकरण करून त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या संस्थांचा हिस्सादेखील राज्य सरकारकडून निश्‍चित कण्यात आला होता. त्यानुसार एसपीव्हीमध्ये सर्वाधिक ५१ टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा १९ टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी १५ टक्के हिस्सा असणार आहे.

विशेष नियोजन प्राधिकरणाची (एसपीव्ही) ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’ स्थापन करण्यासाठी एमएडीसीकडून अर्ज करण्यात आला होता. त्यास कंपनी कायद्यानुसार दोन दिवसांपूर्वी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून पुढे विमानतळासंदर्भातील सर्व कामकाज या कंपनीमार्फत होणार आहे. या कंपनीस मान्यता मिळाल्यामुळे लवकरच अध्यक्ष व संचालक मंडळाची नियुक्ती, कंपनीच्या नावाने स्वतंत्र बॅंक खाते उघडणे, कंपनीत हिस्सेदार असलेल्या सिडको, पीएमआरडीए, एमआयडीसी आणि एमएडीसीकडून त्यांच्या हिश्‍याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करणे आणि भूसंपादनाच्या पॅकेजला मान्यता देणे आदी कामे केली जाणार आहेत.

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करण्यासाठी ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या नावाने कंपनीची नोंदणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून पुढे विमानतळ उभारणीचे सर्व कामकाज या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. 
- सुरेश केकाणे, व्यवस्थापकीय उपाध्यक्ष, एमएडीसी 

Web Title: Purandar Airport Takeoff


संबंधित बातम्या

Saam TV Live