कौतुकास्पद! प्यारे खान झाले नागपूरकरांचे ऑक्सिजन मॅन... ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

एकीकडे अहमदनगर मधील डाँक्टरने वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्याचा वसा घेतला आहे. तर दुसरीकडे नागपूर मधील खान यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाने तब्बल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन दान केलं आहे

नागपूर : एकीकडे अहमदनगर Ahmednagar मधील डाँक्टरने वातावरणातील ऑक्सिजन Oxygen वाढवण्याचा वसा घेतला आहे. तर दुसरीकडे नागपूर Nagpur मधील खान Khan यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने तब्बल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन दान केले आहे. त्यामुळे नागपूरच्या या ऑक्सिजन मॅनचा सर्वत्र कौतुक होत आहे. Pyare Khan has become the Oxygen Man of Nagpur

प्यारे खान हे नागपुरांसाठी ऑक्सिजन मॅन Oxygen Man झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात नागपूरकरांना तब्ब्ल १ कोटी रुपयांचे ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. त्यांच्या अशमी ASHMI रोड वेज कंपनीचे टँकर देशभरातून मिळेल तिथून ऑक्सिजन नागपूरला आणत आहेत. देश वाचाल तर आपण वाचणार आहोत आणि देशच नाही राहील तर आपण कुठे राहणार आहे.

सर्व नागरिकांनी आपआपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, अशी प्रतिकिया प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. मेहनतीच्या जोरावर रिक्षा चालक ते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशी त्यांची प्रगती झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत तब्ब्ल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन देणारे खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live