आता कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर क्यूआर कोड

अरुण जोशी
बुधवार, 28 एप्रिल 2021

राज्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. मात्र,काही जणांकडून कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर खोडतोड करून दुरुपयोग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर क्यूआर कोड, सिक्युरिटी फिचर टाकण्यात आले आहेत

अमरावती : राज्यात कोरोना Corona संसर्गाचा कहर सुरूच आहे. मात्र,काही जणांकडून कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर खोडतोड Scratch करून दुरुपयोग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर क्यूआर कोड QR Code, सिक्युरिटी फिचर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्र पूर्णपणे सुरक्षित असून, यात बदल करता येणार नाही. QR code applied to Corona test report certificate

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात Amravati University कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेतर्फे अशा प्रकारच्या क्यूआर कोडचा वापर सुरु करण्यात आला आहे. कोरोनाचे नमुने चाचणी झाल्यानंतर अहवाल निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, याबाबत अनेकांमध्ये धास्ती असते. मात्र, यापूर्वी पुणे Pune, नागपूर Nagpur येथे अहवाल बदलून मिळतो. अशा काही  घटना उघडकीस आल्या आहेत.

पालकमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या निर्देशानुसार कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर खोडतोड होऊन त्याचा दुरुपयोग होता कामा नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना होत्या. कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्राचा  आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपयोग व्हावा, यासाठी दोन क्यूआर कोड टाकण्यात आले आहे. QR code applied to Corona test report certificate

ज्यापैकी एक क्यूआर कोड हा सर्वसाधारण पद्धतीचा असेल, तर दुसऱ्या कोडमध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती आणि त्याच्या कोरोना चाचणीचा अहवालाची माहिती उपलब्ध असणार आहे. आयसीएमआरच्या पोर्टलवर या प्रमाणपत्राच्या सुरक्षेविषयी बाबी नमूद असणार आहे. हा क्यूआर फक्त चाचणीचा अहवाल तयार करतानाच जनरेट होईल, त्याशिवाय इतरत्र कुठेही जनरेट होणार नाही. या पद्धतीमुळे खोट्या प्रमाणपत्रांच्या वापराला आळा बसेल, असा विश्वास संत गाडगेबाबा Saint Gadge Baba अमरावती विद्यापीठ कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे यांनी यांनी व्यक्त केल आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live