खुशखबर! देशात मुंबई आयआयटी अव्वल

खुशखबर! देशात मुंबई आयआयटी अव्वल

मुंबई: जगभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देणाऱ्या 'क्यूएस रँकिंग'ने नुकतीच रोजगारक्षम शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वोत्तम १००मध्ये देशातील एकही संस्था नसून, ११० ते २०० या गटात आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास आणि आयआयटी दिल्ली या संस्थांचा समावेश आहे. तर मुंबई विद्यापीठ देशात सातव्या तर जागतिक क्रमवारीत २५१ ते ३०० दरम्यान आहे. क्यूएस या संस्थेकडून विविध निकषांवर आधारित विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. विद्यापीठातील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी, त्यांना मिळणारे उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या याआधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. या क्रमवारीनुसार देशातील दहा विद्यापीठे पाचशे क्रमांकाच्या यादीत आहेत. कंपन्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद मुंबई आयआयटीला मिळत असल्याचे या पाहणीत आढळले आहे. यासाठी मुंबई आयआयटीला ७१.२ टक्के गुण मिळाले आहेत. देशात उत्तीर्ण होणारे पदवीधर हे रोजगारक्षम नसतात, अशी ओरड सातत्याने होत आहे. त्यावर 'क्यूएस रँकिंग'च्या ताज्या अहवालाने शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तम २०० संस्थांच्या यादीत देशातील अवघ्या चारच संस्थांचा समावेश आहे. यात आयआयटी मुंबई अव्वल असून, या संस्थेचा क्रमांक १११ ते १२० या गटात आहे.

भारतीय शिक्षणसंस्थांचे स्थान

आयआयटी मुंबई : १११ ते १२०

आयआयटी दिल्ली : १५१ ते १६०

आयआयटी मद्रास : १७१ ते १८०

दिल्ली विद्यापीठ : १९१ ते २००

आयआयटी खरगपूर : २०१ ते २५०

बिट्स पिलानी, मुंबई विद्यापीठ : २५१ ते ३००

आयआयएससी, आयआयटी कानपूर, कोलकाता विद्यापीठ : ३०१ ते ५००

Web Title qs graduate employability rankings declares iit bombay as top indian institute

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com