'या' स्टेडियमवर उभारणार  क्वारंटाईन सेंटर ?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 16 मे 2020

भारताने याच स्टेडियममध्ये श्रीलंकेला नमवित 2011 साली विश्वचषक जिंकला होता. मुंबईत यापूर्वी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया,बिकेसी एमएमआरडीए ग्राऊंड, गोरेगाव नेस्को येथे यापूर्वीच क्वारंटाईन सेंटर बनविले आहे.

मुंबई : मार्चमध्ये मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 लाख रुपयांची मदत केली.त्याच वेळी असोसिएशनने वानखेडे स्टेडियम क्वारंटाईन सेंटर बनविण्यासाठी उपलब्ध असेल असे म्हटले होते.

भारताने याच स्टेडियममध्ये श्रीलंकेला नमवित 2011 साली विश्वचषक जिंकला होता. मुंबईत यापूर्वी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया,बिकेसी एमएमआरडीए ग्राऊंड, गोरेगाव नेस्को येथे यापूर्वीच क्वारंटाईन सेंटर बनविले आहे. मुंबईमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यानंतर महानगरपालिका रुग्णालय, हॉटेल्स, शाळा, महाविद्यालय, कम्युनिटी सेंटर आणि हॉल यांना क्वारंटाईन सेंटर बनवून रुग्णांची काळजी घेत आहेत.

भारताने 2011 साली क्रिकेट विश्वचषक हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे जिंकला होता, हे कोणताच भारतीय विसरणार नाही, पण आता हेच वानखेडे स्टेडियम कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी क्वारंटाईन सेंटर बनविण्यात येणार आहे. 

ए वॉर्डच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी यासंबंधी पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवले असून स्टेडियमला महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. एमएमआरडीएमध्ये ज्या पद्धतीचे क्वारंटाईन सेंटर आहे.त्याचप्रमाणे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे सेंटर असेल. यामध्ये ऑक्सिजन आणि अन्य वैद्यकीय सुविधांचा देखील समावेश असणार आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकार्‍याने सांगितले.
 

WebTittle :: A quarantine center will be set up at Stadium ? 


संबंधित बातम्या

Saam TV Live