मला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..!

Ankush Gundwar
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

लखनौ - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात न

लखनौ - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा असतानाही वरिष्ठ नेत्यांनी दमदाटी केल्याचा दावा उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या एका नेत्याने केला. अयूब अली असे त्यांचे नाव आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे ही पक्षांतर्गत निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, राहुल यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा असलेल्या अयूब यांना वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. यासंदर्भात अयूब यांनी काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक अधिकारी एम. रामचंद्रन यांची भेट घेतली होती. मात्र, रामचंद्रन यांनी दमदाटी केली, असा आरोप अयूब यांनी काल (गुरूवार) पत्रकारांशी बोलताना केला.

''मी ही निवडणूक लढवू शकत नाही. या पदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार असतील, असे मला सांगण्यात आले. रामचंद्रन यांनी मला त्यांच्या कार्यालयातून बाहेर हाकलले. ही कुठली लोकशाही आहे?'' अशी प्रतिक्रिया अयूब यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, 'एकमेव उमेदवार' असल्याने बिनविरोध निवड झालेल्या या निवडणुकीविषयी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते शहजाद पूनावाला यांनीही आक्षेप घेतला होता. 'ही संपूर्ण प्रकिया म्हणजे 'इलेक्शन' नसून 'सिलेक्शन' आहे', अशी टीका पूनावाला यांनी केली होती.


संबंधित बातम्या

Saam TV Live