राहुलच्या मेहनतीचे यश : सोनिया गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : ''राहुल गांधी यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीचे हे यश आहे'', अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन केले. 

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून, भाजप मात्र पिछाडीवर आहे. या राज्यांच्या प्रचारसभेची धुरा प्रामुख्याने राहुल गांधी यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन केले, याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.   

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आघाडी मिळत असल्याचे समोर आले असले तरीदेखील राहुल गांधी यांनी 'आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत', असे सांगितले.  

Web Title: Rahul Gandhi has worked hard says UPA Chairperson Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live