पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

'मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी मी असहमत आहे. मात्र जम्मू-काश्मीर हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही', असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. ट्विट करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. 

जम्मू-काश्मीच्या मुद्द्यावरुन संतप्त होऊन राहुल गांधी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार होत आहे. कारण त्याठिकाणी जगभरात दहशतवादाचा प्रमुख समर्थक मानल्या जाणार्‍या पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे आणि त्याचे समर्थन सुध्दा केले जात आहे.


WebTittle :rahul gandhi says kashmir is india internal issue and there is no room for pakistan to interfere in it

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com