राहुल गांधीचे पंतप्रधान मोदींना पत्र; लक्षद्वीप बेटाचे रक्षण करण्यासाठी..

rahul gandhi.jpg
rahul gandhi.jpg

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश Union Territory  लक्षद्वीपमध्ये Lakshadweep दारू Alcohol आणि गोमांस बंदीचे Beef ban राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi  यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी PM Narendra Modi  यांना पत्र लिहिले आहे. त्यात केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल प्रफुल्ल खोदा पटेल  यांना हटवण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने केली आहे. ''लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृती अनेक पिढ्यांपासून चालत आले आहे. तेथील प्रशासकाचे कार्य पुढील पिढ्यांसाठी द्वीपसमूहचा वारसा जपणे आहे. तथापि, लक्षद्वीपच्या प्रशासकाच्या जाहीर करण्यात आलेल्या लोकविरोधी कायद्यांमुळे  लक्षद्वीपचे सौंदर्य धोक्यात आले असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहील आहे.  (Rahul Gandhi's letter to PM Modi; To protect Lakshadweep Island ..) 

तसेच, ' लक्षद्वीप प्रशासन नव्या कायद्यांच्या नावाखाली बेटाचे पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामुळे यात आपण  हस्तक्षेप करावा,  अशी  राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.  लक्षद्वीप प्रशासनाने जाहीर केलेल्या लोकविरोधी धोरणांमुळे लोकांचे भविष्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधी किंवा जनतेशी चर्चा न करता  प्रशासनाने मनमानी प्रस्ताव दिल्याचा आरोपही या पत्रात राहुल गांधी यांनी केला आहे. 

त्याचबरोबर, ''लक्षद्वीपातील लोक आपली जीवनशैली आणि आपल्या आकांक्षा उंचावण्यासोबतच विकासाच्या दृष्टीकोनास पात्र आहेत. लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृती अनेक पिढ्यांपासून चालत आले आहे. तेथील प्रशासनाचे कार्य पुढील पिढ्यांसाठी द्वीपसमूहातील वारसा जतन करणे आहे. मात्र लक्षद्वीपच्या प्रशासनान जाहीर केलेल्या नव्या कायद्यांमुळे लक्षद्वीपमधील लोकविरोधी धोरणांमुळे तेथील नागरिकांचे भविष्य धोक्यात आले असल्याचं राहुल गांधी यांनी या  पत्रात म्हटल आहे.

काय  आहे नवा  कायदा ?

लक्षद्वीप येथून दारू पिण्यावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. यासह, जनावरांच्या संरक्षणाचा हवाला देत गोमांस उत्पादनांवर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. लक्षद्वीपमधील बहुसंख्य लोकसंख्या मत्स्यपालनावर अवलंबून आहे. पराणतू प्रफुल्ल पटेल यांनी तटरक्षक दलाच्या कायद्याच्या उल्लंघनाच्या आधारे किनारपट्टी भागात मच्छिमारांच्या झोपड्या तोडण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com