अखेर दीड महिन्याच्या कालावधीनंतर 'महाबीज'ला मिळाले 'एमडी'

साम टिव्ही ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर महाबीजला अखेर एमडी मिळाले आहेत. विशेष म्हणजे महाबीज ला एमडीच मिळेना अश्या आशयाची बातमी साम टीव्ही ने दाखवली होती

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या Mahabeej व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार अखेर राहुल रेखावार Rahul Rekhawar यांनी स्वीकारला. तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर महाबीजला अखेर एमडी मिळाले आहेत. विशेष म्हणजे महाबीज ला एमडीच मिळेना अश्या आशयाची बातमी साम टीव्ही ने दाखवली होती. Rahul Rekhawar Appointed as Managing Director of Mahabeej

कारण महाबीज वर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी IAS येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे समोर आले होते. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत G. Shrikanth यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १७ फेब्रुवारीला महाबीज मुख्यालय गाठले. आल्या आल्या कामकाजाचा आढावा घेतला. नंतर अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये Aurangabad सेल्स टॅक्स Sales Tax विभागात नियुक्ती झाल्याचे आदेश धडकले. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली गेली. 

यालाही आता दीड महिना लोटला होता.  मात्र रेखावार हे सुद्धा अद्याप रुजू झालेले नव्हते. कुणीही पूर्णवेळ अधिकारी नसल्याने सध्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी जी. श्रीकांत औरंगाबादेतून सांभाळत होते. नियुक्ती केलेले रेखावार यांची इच्छा नसल्याची चर्चा सुद्धा महामंडळाच्या मुख्यालयात ऐकायला मिळत होती. आता हंगामापूर्वी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते अशी शक्यता देखील व्यक्त होत होती. एकीकडे खरीप हंगाम जवळ आला असताना महाबीजला प्रशासकीय अधिकारी नसल्याने बियाण्यांचे नियोजनाचा विषय होता. Rahul Rekhawar Appointed as Managing Director of Mahabeej

मात्र अखेर दीड महिन्याच्या पदीर्घ कालावधीनंतर बीडचे जिल्हाधिकारी असलेले राहुल रेखावार यांनी आपला महाबीजचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या खरीप हंगामात महाबीज सोयाबीनचे  बियाण्यांचा उगवले नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. आता नव्याने आलेल्या राहुल रेखावर यांच्या वर खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे देण्याची जबाबदारी आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live