पन्हाळ्यावर भरवस्तीतील हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

आपटी - पन्हाळावर भरवस्तीतील असलेल्या हॉटेलवर मंगळवारी सायंकाळी पोलीसांनी छापा टाकला. पोलिस महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली. यामध्ये राधिका विजय लाखे (वय  ३० रा.महादेव नगर इस्लामपूर) या दलाल महिलेसह वेशाव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना अटक केली. ऐतिहासिक पन्हाळगडाचे पावित्र्य अशा हॉटेल व्यावसायीकांमुळे धोक्यात आले आहे. 

राधिका लाखे या दलाल महिलेवर काही दिवसांपासून पोलिसांनी पाळत ठेवली होती. याची शहानिशा करणेसाठी या पथकाने आपल्या पंटराना बोगस ग्राहक म्हणून लाखे यांचेकडे
पाठवल्रे. त्यानंतर लाखे ही बोगस ग्राहक व पिडीत महिलांना घेऊन आज पन्हाळ्यात आली होती. भरवस्तीतील नंदिनी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हे सर्वजण आले होते. सायंकाळी सहा वाजता पोलिसांच्या पथकाने  छाप्याची कार्यवाही केली.

पोलीस उपनिरीक्षक मृगदीप सुधाकर गायकवाड यांनी केलेल्या कार्यवाहीत वेशाव्यवसाय करणाऱ्या दोन महिलेसह दलाल महिलेला रंगेहात पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कार्यवाही सूर्यास्तानंतर झाल्याने व आरोपी महिला असल्याने कोर्टाची परवानगी घेऊन पन्हाळा पोलिसांनी या बाबत संबधितांना रात्री उशिरा अटक केली.

या घटनेनंतर पन्हाळ्यातील सर्व लॉजिंग बंद करण्यात आली. या घटनेमुळे पन्हाळ्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.  हॉटेलचा व्यवस्थापक पंकज तानाजी कल्याणकर याचेकडे पोलिस चौकशी करणार असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यत पन्हाळा पोलिसात पोलीस निरीक्षक रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हा नोदविण्याचे काम चालू होते.

Web Title: raid on Hotel in Panhala

संबंधित बातम्या

Saam TV Live