अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड ऑन अलर्ट !

दिनेश पिसाट
बुधवार, 9 जून 2021

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १० आणि ११ तारखेला कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

रायगड - रायगड Raigad जिल्ह्यात कालपासूनच मान्सून Monsoon सक्रिय झाला असून जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण,काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस Rain सुरु आहे. Raigad On Alert Against Heavy Rains 

SBI: पैसे काढणे होणार आता महाग; चेकबुकसाठीच्याही नियमांत बदल  

हवामान विभागाच्या अंदाजानुसार IMD १० आणि ११ तारखेला कोकण Konkan किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील District नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात दरडी Landslide कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिसंवेदनशील दरडग्रस्त 103 गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा - 

नदी, खाडी आणि समुद्र किनारी असलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायतींना देखील सर्व सामुग्रीसह सज्ज राहण्यास सांगितले आहे. किनारपट्टीवरील तसेच आदिवासी भागातील धोकादायक घरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे. तरुण मंडळींनी पूर पाहायला किंवा पोहायला जाऊ नये तसेच सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live