रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस 

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस 

अलिबाग : रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. त्यामुळे आतापर्यंत सरासरी पेक्षा तब्बल 1 हजार 547 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी 4 हजार 479 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तळा तालुक्‍यात सर्वाधिक (5509) नोंद झाली आहे. हा 20 वर्षांतील विक्रम आहे. 

जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. जूलैच्या पहिल्या आठवड्यातही तर त्याने विक्रम मोडले. त्यामुळे नदी, तलाव, विहीरी धरणे, तसेच शेतेही पाण्याने तुडूंब भरून गेली. त्यानंतर काही दिवस उसंत घेतल्यानंतर त्याने पुन्हा जोरदार सुरुवात केली. ती अजूनही कायम आहे. त्यामुळे अलिबागसह, माणगाव, महाड, नागोठणे, पाली, रोहा अशा अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 3 हजार 142.64 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी 4 हजार 479. 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुलनात्मकदृष्टया 142.53 टक्के अधिक नोंद झाली आहे. माथेरानमध्ये तर 6497.44 मिलिमीटर नोंद आहे. जिल्ह्यातील सरासरी पावसाचा हा 20 वर्षांतील विक्रम आहे. 

अतिवृष्टीचा जिल्हयाला मोठा फटका बसला आहे. 18 हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे यंदा नुकसान झाले आहे. तर 6 कोटी रुपयांहून अधिक सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. 

पावसावर दृष्टीक्षेप 
तालुका सरासरी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
अलिबाग - 2752.28 
पेण - 5332.90 
मुरुड - 3824 
पनवेल - 4155.02 
उरण - 3120.50 
कर्जत 4271.24 
खालापूर - 4301 
माणगाव - 5151.05 
रोहा - 5042 
सुधागड - 4196 
तळा - 5509 
महाड - 4042 
पोलादपूर - 5155 
म्हसळा - 4606 
श्रीवर्धन - 3711 
माथेरान - 6497.44 


Web Title: Raigad district recorded rainfall

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com