VIDEO | कांजूरमार्ग स्टेशनवर रेलरोको आंदोलन

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 29 जानेवारी 2020

कांजूरमार्ग स्थानकात रेल्वे रोको झाल्याचे कळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे रुळावर उतरलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी दूर केले. त्यानंतर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकात आज सकाळ सुमाराला बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळांवर उतरत एसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल रोखून धरली.

या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे  जाणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीची वेळ असल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे.

कांजूरमार्ग स्थानकावरील रेल रोको आंदोलन संपल्यानंतर अर्ध्या तासाने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, या आंदोलनाचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या मुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले.

ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे. या मुळे नेहमी वेळेत कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांना कामावर रुजू होण्यास विलंब लागत आहे.

आज संपूर्ण भारतात नागरिकत्व विधेयक आणि एनआरसीविरोधात ट्रेड युनियन्स, विविध संघटना आणि बहुजन क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे.

WebTittle ::  Railroad movement at Kanjur Marg station

संबंधित बातम्या

Saam TV Live