BIG BREAKING | लाईफलाईन लॉकडाऊन, लोकलसह सर्वच रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

ब्युरो रिपोर्ट
रविवार, 22 मार्च 2020

कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याने आणि संसर्ग वाढत असल्याने, महाराष्ट्रात 25 मार्चपर्यंत रेल्वे सेवा लॉकडाऊन करण्यात आली आहे. मुंबई लोकलही बंद करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली- देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील संपूर्ण रेल्वेसेवाच 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या निर्णयानंतर आता, मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या उपनगरीय सेबेबाबतही आजच निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आजच लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. दरम्यान, मुंबई लोकल बंदीचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आता जवळपास शंभर टक्के लॉकडाऊन होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 
 

मुंबई लोकल लॉकडाऊन - 

आजपासून ३१ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणारे नागरिक वगळता 31 मार्च पर्यंत इतर कोणताही प्रवासी लोकलमधून प्रवास करू शकत नाही. मध्य, पश्चिम आणि हाबर रेल्वे मार्गावरील लोकलची गर्दी टाळण्यासाठी सामान्य प्रवाशांच्या प्रवासास बंदी घालण्यात आली.होती मात्र आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आल आहे. मुंबईची लाईफलाईन लॉकडाऊन करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा बंद केल्यानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. गर्दी थांबवण्यासाठी हा सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 

 

याआधी घेण्यात आलेला प्रवाशांसाठी मोठी निर्णय -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली होती..रेल्वेने सर्व पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्या गाड्या सकाळी ७ वाजता सुटलेल्या असतील त्या आपल्या शेवटच्या स्थानकापर्यंत विनाअडथळा पोहोचणार आहेत. या गाड्यांची तिकिटे रद्द करण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे. याव्यतिरिक्त, मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमधील कॅटरिंगची सुविधाही पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा आयआरसीटीसीने केली होती.

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

railway board decision on lockdown of trains in india marathi maharashtra mumbai big breaking covid 


संबंधित बातम्या

Saam TV Live