ठाणे पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद; गर्दीत वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन जुने पुल जीर्णावस्थेत असून रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या सर्वेक्षणामध्येही ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे नियोजन रेल्वेकडून सुरु करण्यात आले होते. या पुलाच्या दुरुस्तीकामासाठी पूल 2 फेब्रुवारीपासून बंद करण्याचे नियोजनही घोषित करण्यात आले होते. परंतू कंत्राटदाराच्या विलंबामुळे या कामास अद्याप सुरुवात झाली नव्हती. अखेर या कामास मुहूर्त मिळाला असून रविवारपासून नागरिकांसाठी पादचारी पूल प्रवासासाठी बंद करण्यात आल्याची नोटीस रेल्वेच्या वतीने लावण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन जुने पुल जीर्णावस्थेत असून रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या सर्वेक्षणामध्येही ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे नियोजन रेल्वेकडून सुरु करण्यात आले होते. या पुलाच्या दुरुस्तीकामासाठी पूल 2 फेब्रुवारीपासून बंद करण्याचे नियोजनही घोषित करण्यात आले होते. परंतू कंत्राटदाराच्या विलंबामुळे या कामास अद्याप सुरुवात झाली नव्हती. अखेर या कामास मुहूर्त मिळाला असून रविवारपासून नागरिकांसाठी पादचारी पूल प्रवासासाठी बंद करण्यात आल्याची नोटीस रेल्वेच्या वतीने लावण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे गर्दीचे स्थानक असून प्रवाशांना आता पूलबंदीला सामोरे जावे लागणार आहे.

स्थानकातील मधला पादचारी पूल हा प्रशस्त असला तरी जीने चढण्य़ाचा त्रास वाचावा यासाठी अनेक नागरिक जुन्या पादचारी पूलाचा वापर करीत होते. रविवारी पत्रे लावून हा पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक येथे लावण्यात आला. परंतू हा फलक अर्ध्या पुलावर लावण्यात आल्याने त्या पुलावरुन जाण्यासाठी वळल्यानंतर नागरिकांच्या तो पूल बंद असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे अनेकजण माघारी फिरत होते. जुना पूल बंद करण्यात आल्याने नवीन पुलाचाच वापर नागरिकांना करावा लागला. परंतू स्थानकात येणारे पादचारी आणि स्थानकातून बाहेर पडणाऱे पादचारी यांची पूलावरील गर्दी पाहून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले असलेले कुटूंब गर्दीत शिरण्याचे धाडस करत नव्हते. गर्दी ओसरण्याची अनेक प्रवासी वाट पाहत स्थानकातच थांबून होते, परंतू गर्दी ओसरता ओसरता दुसरी लोकल पाठून स्थानकात दाखल होत असल्याने त्यातून उतरलेल्या प्रवाशांची पुन्हा स्थानकात गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.

धोकादायक अवस्थेत असलेल्या कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात लोकस, एक्सप्रेससह ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांचीही गर्दी होत असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी फलाट क्रमांक दोन आणि तीन वरील प्रवेश बंद राहील. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा हाती घेण्यात येईल त्यादरम्यान फलाट क्रमांक 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वरील प्रवेश बंद राहील. पूल बंदीच्या काळात प्रवाशांनी स्थानकातील उर्वरीत पुलांचा वापर करावा अशी सुचना मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: railway bridge closed in Thane

संबंधित बातम्या

Saam TV Live