आजपासून रेल्वे प्रवासासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

 आजपासून रेल्वे प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेने प्रवाशांना दरवाढीचा धक्का दिला. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून मेल-एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली. नवीन वर्षात रेल्वे प्रवासासाठी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे.

मेल-एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति कि.मी. २ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति कि.मी. २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. वातानुकुलित शयनयानपासून (एसी) ते सामान्य श्रेणीपर्यंत (जनरल) रेल्वे प्रवासासाठी प्रति कि.मी.साठी १ ते ४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेने उपनगरीय प्रवाशांना दिलासा दिला असून याचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सामान्य ट्रेनच्या द्वितीय श्रेणीसाठी (नॉन एसी सेकंड क्लास)  शयनयान श्रेणी (स्लीपर क्लास) आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. एका पैशाने वाढविण्याचा निर्णय रेल्व प्रशासनाने घेतला आहे.  

 शताब्दी, राजधानी, दुरंतो यांसारख्या प्रीमियम गाड्यांही भाडेवाढ लागू असणार आहे. मेल-एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति कि.मी. ४ पैसे अधिक मोजावे लागतील. वातानुकुलित चेअर कार, वातानुकुलित ३ टियर, वातानुकुलित २ टियर आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. ४ पैशांनी वाढवण्यात आले आहे.

Web Title:railways announces fare hike Mail and Express trains

संबंधित बातम्या

Saam TV Live