रेल्वेने विद्या पाटील यांच्या मुलींना आर्थिक मदत करावी :  मनसे 

प्रदीप भणगे
गुरुवार, 3 जून 2021

मोबाईल चोराशी झटपाट करताना डोंबिवली मधील विद्या पाटील  यांचा कळवा रेल्वे स्थानकात अपघात झाला होता.या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या 3 लहान मुली या पोरक्या झाल्या आहेत.

डोंबिवली : मोबाईल चोराशी झटपाट करताना डोंबिवली मधील विद्या पाटील  यांचा कळवा रेल्वे स्थानकात अपघात झाला होता.या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या 3 लहान मुली या पोरक्या झाल्या आहेत. ही बातमी साम टीव्हीने दाखवली. या बातमी दखल घेत मनसे आमदार राजू पाटील बातमी ट्विट करत रेल्वेने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.तसेच साम टीव्ही बोलताना सांगितले की हा अपघात प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे झाला आहे. (Railways should provide financial assistance to Vidya Patil's daughters: MNS) 

फक्त घोषणाबाजी नाही,  शिवसेना आधी काम करते;  श्रीकांत शिंदे यांचा भाजपला...

मुलींच्या शिक्षणासाठी डोंबिवलीच्या विद्या पाटील या मुंबईत कामासाठी एका खासगी कंपनीत जात होत्या.शनिवारी सायंकाळी त्या नेहमी प्रमाणे त्या डोंबिवलीच्या दिशेने घरी निघाल्या होत्या. मात्र कळवा रेल्वे स्थानकात ट्रेन आल्या नंतर डब्यात पाच महिला असल्याच पाहत चोराने या रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला होता. पाटील यांचा मोबाईल चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत विद्या पाटील यांचा तोल जाऊन त्या रेल्वेखाली आल्या आणि त्यांच दुर्दैवाने निधन झालं आणि 3 लहान मुली आईच्या माये पासून वंचित झाल्या.विद्या पाटील याचे चाळीत एक लहानसे घर आहे.त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.ही बातमी साम टीव्हीने दाखवली. आता या बातमी दखल घेत मनसे आमदार राजू पाटील बातमी ट्विट करत रेल्वेने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. हा अपघात प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट
चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून डोंबिवली मधील विद्या ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला आहे. मुळात लॉकडाऊन असताना चोर रेल्वे स्टेशनवर आलाच कसा ? विद्या पाटील यांना 3 लहानमुली आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या मुलींना आर्थिक मदत करावी. 


संबंधित बातम्या

Saam TV Live