दिल्लीत पावसाच आगमन 

साम टीव्ही न्यूज
रविवार, 10 मे 2020

करोना व्हायरस लॉकडाऊन सुरू असतानाच दिल्लीत रविवारी अचानक आभाळ भरून आलं... भरदिवसा धुळीनं वातावरण अंधारमय झालं आणि मोठ्या वादळ-वाऱ्यासह दिल्ली - एनसीआरमध्ये पावसाला सुरुवात झाली.
राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात आज पहाटे आभाळ भरून आलेलं दिसलं.

 

नवी दिल्ली :  ११ वाजल्याच्या दरम्यान वातावरण अंधारलं आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागानं अगोदरच दिल्ली एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला होता. देशात करोना संकट पसरलं असतानाच दिल्लीत अवकाळी पाऊसाला सुरुवात झालीय. करोना व्हायरस लॉकडाऊन सुरू असतानाच दिल्लीत रविवारी अचानक आभाळ भरून आलं... भरदिवसा धुळीनं वातावरण अंधारमय झालं आणि मोठ्या वादळ-वाऱ्यासह दिल्ली - एनसीआरमध्ये पावसाला सुरुवात झाली.
राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात आज पहाटे आभाळ भरून आलेलं दिसलं.

करोनानं राजधानी दिल्लीलाही बेजार केलंय. दिल्लीत ६५४२ नागरिक करोनाबाधित आढळलेत तर ७३ जणांचा मृत्यू झालाय.
 शनिवारी दिल्लीतील काही ठिकाणी पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. अचानक तपमान वाढल्यानं नागरिक हैराण झाले होते... पण रविवारी सुरु झालेल्या पावसानं इथल्या नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर टाकलीय. 
 

WebTittle ::  Rain arrives in Delhi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live