पावसाचा परिणाम मतदानावर?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

जोरदार पावसासोबत विजांच्या कडकडाटासोबत वाऱ्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. पुढचे तीन दिवस मुख्यत्वे मुंबई कोकणात पावसाचा अंदाज तर आहेच, पण त्यासोबत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय.

पुढील काही दिवस वर्तवल्या गेलेल्या पावसाच्या अंदाजामुळे आता, पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होणार का ? हे पाहावं लागेल.

WebTitle : rain in maharashtra might result in reduced percentage of voters

संबंधित बातम्या

Saam TV Live