पुण्यात आजही पावसाची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

 

पुणे - शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पुढील चोवीस तास ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

 

पुणे - शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पुढील चोवीस तास ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे दुपारी देण्यात आला होता. त्याच दरम्यान सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे वादळीवारा आणि पावसाला सुरवात होण्यापूर्वीच संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेकांनी घरी परत जाण्याचा प्रयत्न केला. शाळकरी मुले संध्याकाळी वेळेत घरी पोचतील, अशी व्यवस्था पालकांनी केली होती, त्यामुळे सातच्या आत घरात गेलेले पुणेकर सुरक्षित होते. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेग वाढला आणि मुसळधार सरी पडू लागल्या. शहराच्या मध्यवस्तीतील पेठांमध्ये हे चित्र दिसत असतानाच पूर्व पुण्यातील लष्कर भाग, नगर रस्ता, येरवडा, विश्रांतवाडी आणि खडकी येथे जोरदार पाऊस पडत होता. त्यानंतर कोथरूड, बाणेर आणि पाषाण परिसरात पावसाचा जोर वाढला.

शहरात सकाळी आकाश अंशतः ढगाळ होते, त्याच वेळी दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत होता. ‘ऑक्‍टोबर हीट’ची तीव्रता जाणवत होती; पण दुपारनंतर ढग दाटून आले, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावला असला तरीही हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ८८ टक्के होते. या सर्वांचा परिणाम म्हणून दुपारी तीन वाजल्यानंतर आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे पुढील चार तासांमध्ये वादळीवाऱ्यासह ढगांचा गडगडाट करत पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, अशी असा इशारा हवामान खात्याने दुपारी दिला. याप्रमाणे उपनगरांमध्ये संध्याकाळी पावसाच्या सरी पडल्या.

पावसाचा अंदाज
शुक्रवार (ता. ११) - ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता.
शनिवार (ता. १२) - मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता.
रविवार (ता. १३) - हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता.

Web Title: rain pune monsoon


संबंधित बातम्या

Saam TV Live