राज्यभरातील पावसाचे अपडेट्स! कुठे मुसळधार तर कुठे अजुनही प्रतिक्षाच...

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020

सध्या पावसाचे आगमन कुठे झाले आणि कुठे अजुनही प्रतिक्षा आहे, ते पाहुयात बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्याला पावसाने झोड़पले, रात्रीच्या सुमारास धगफुटी सारखा पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले तुडंब भरून वाहत आहे पातुरडा गावाच्या मधून वाहत नसलेल्या वान नदीला पुर आल्याने जिल्ह्याशी पाच गावाचा संपर्क तुटला आहे गावातून वाहणाऱ्या वान नदीला पुर आल्याने पातुरडा गावातील पुलावरून पाच फुट पाणी वाहत आहे...

सध्या पावसाचे आगमन कुठे झाले आणि कुठे अजुनही प्रतिक्षा आहे, ते पाहुयात

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्याला पावसाने झोड़पले, रात्रीच्या सुमारास धगफुटी सारखा पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले तुडंब भरून वाहत आहे पातुरडा गावाच्या मधून वाहत नसलेल्या वान नदीला पुर आल्याने जिल्ह्याशी पाच गावाचा संपर्क तुटला आहे गावातून वाहणाऱ्या वान नदीला पुर आल्याने पातुरडा गावातील पुलावरून पाच फुट पाणी वाहत आहे...

बुलडाण्यातल्या संग्रामपुर तालुक्यातील वानखेड़ परिसरात ढगफूटीसदृश पाऊस झालाय...या पावसामुळं शेकडो हेक्टर शेतीतील पीकं वाहून गेलीत...यामुळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. शेकडो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे...बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, संग्रामपुर, वरवंट बकाल, पातुरडा,वानखेड,  मोताळा , चिखली येथे मुसळधार चार तास पाऊस झालाय. 

जालन्यातील अंबड आणि बदनापूर तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला...त्यामुळे 6 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आलीय..,बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात दोन तासात 207 मी.मी.पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलीय..,याच परिसरातून वाहणाऱ्या दुधाना नदीला तब्बल 15 वर्षानंतर  मोठा पुर आला..., यामुळे दुधना नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधारे तुडुंब भरून वाहत आहे,...त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळालाय..,परिसरात झालेल्या या पावसाने दुधना नदीचे तुडुंब भरून वाहतानाचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेत.

नंदुरबारमध्ये काल रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली... महाराष्ट्रात झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती... झालेल्या पावसाने शेतकरी राजा काहीसा सुखावणार असून....दुबार पेरणीचं संकट टळलंय... तसेच उर्वरित पेरण्यांनाही या पावसामुळे वेग मिळालाय... जोरदार पावसामुळे  नंदुरबार शहरातील सखल भागात पाणी साचून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं... तर काही गाड्यादेखील पाण्यात अडकल्या... जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर बरसलेल्या मुसळधार सरींमुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांनी वेग धरल्याचं पाहायला मिळतंय.

तर, उस्मानाबादमध्ये मागच्या 8 ते 15 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे.., त्यामुळे जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस पडलेलाच नाही. वेळेवर न आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीच संकट ऊभं ठाकलं आहे.... काल जिल्ह्यातील कांही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला मात्र उर्वरित जिल्हा हा अजून ही दमदार पावसापासून वंचितच आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सावनगीरा, जाजनुर, अबुलगा, केदारपूर हणमंतवाडी बोटकुळ भागात  मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीनंतर उगवलेली  लहान पिंकं या पावसाच्या पाण्यात वाहून गेलीत..या पावसात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर निलंगा अंबुलगा रस्त्यावरील सावनगीरा गावा नजीक असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.  सर्वत्र रानावर पाणीच पाणी दिसत आहे शेतातील सर्वच आरणी भरल्या आहेत. कोरोना मध्ये डबघाईला आलेला शेतकरी उसनवारीने पैसा काढून पेरणी केला परंतु निसर्ग माञ शेतकऱ्यांना साथ देत नाही आवकाळी पाऊस पडून रब्बी पिकांचे नुकसान झाले आणि आता पावसाने पेरलेले वाहून घेऊन गेले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निलंगा सावगीरा रस्त्यावर मोठा पुल बांधावा अशी वाहनधारकांची मागणी होत आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live