महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस, वाचा कुठे किती पाऊसाची शक्यता?

महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस, वाचा कुठे किती पाऊसाची शक्यता?

सलग तीन दिवस जोरदार बरसल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून काहीसा कमी झालाय. पण आजपासून पुढचे 3 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 9 जुलैपर्यंत कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यताय. तर पुणे आणि घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी बरसतील असं सांगण्यात आलंय. विदर्भ आणि मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. दरम्यान, आज पुन्हा एकदा दुपारी समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल वांद्रे भागात मुसळधार पावसाने घरात पाणी शिरलं होतं. त्यामुळे लोकांचं नुकसान झालं होतं. 

कोकणातील भात लावणीच्या अंतीम टप्प्याला सुरुवात झालीय..पावसाअभावी इथली शेतीची काम खोळंबली होती मात्र दोन दिवसांपासून पडणा-या  समाधानकारक  पावसामुळे पुन्हा एकदा शेतीच्या कामांना वेग आलाय. लाँकडाऊन असलं तरी बळी राजा मात्र शेतीची काम उरकण्यात गुंतलाय..भात रोप लावणीची काम सध्या शेतात सुरु आहेत....अगदी लहान मुलं देखील या शेतातील लावणीची मजा घेताना दिसताहेत.. शेतातील बांधावरुन थेट आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीतील प्रतिनिधी अमोल कलये यांनी.

दरम्यान, गुजरातच्या विविध भागात पावसाचा कहर पाहायला मिळतोय..गुजरातच्या पोरबंदर, द्वारका या भागात पावसाचा सर्वाधिक जोर आहे. पोरबंदर भागातल्या रस्त्यांना तर पावसामुळं नद्याचं स्वरुप आलंय. इथल्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय. तर द्वारका भागातल्या अनेक सखल भागात पाणी साचलंय. यामुळं अनेक रहिवासी इमारतीतील वाहन पाण्याखाली बुडालीय. पावसाचं पाणी भरल्यामुळं अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गुजरातमध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com